पुणे: नवरा-बायकोच्या वादानंतर 2 महिन्याच्या बाळाला दिलं रस्त्यावर फेकून; पोलिसांकडून आई-वडिलांवर गुन्हा दाखल

खडकीतील मेथॉडिस्ट चर्च परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीला 2 महिन्याचे बाळ सापडले होते. अखेर पोलिसांनी या बाळाच्या आई-वडिलांचा शोध लावला आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, नवरा-बायकोमध्ये झालेल्या भांडणानंतर या बाळाला रस्त्यावर टाकून देण्यात आलं असावं.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुण्यात (Pune) माणूसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. खडकीतील मेथॉडिस्ट चर्च परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीला 2 महिन्याचे बाळ सापडले होते. अखेर पोलिसांनी या बाळाच्या आई-वडिलांचा शोध लावला आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, नवरा-बायकोमध्ये झालेल्या भांडणानंतर या बाळाला रस्त्यावर टाकून देण्यात आलं असावं.

दरम्यान, मंगळवारी खडकीतील मेथॉडिस्ट चर्च परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या सोनाली अडागळे या महिलेला रस्त्याच्या बाजूस सुमारे दोन महिन्यांचे बाळ सापडले. त्यानंतर या महिलेने बाळाला घेऊन जवळच्या पोलिस स्टेशमध्ये संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी या बाळाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडिचा वापर केला. दरम्यान, व्हॉट्सअॅप नंबरवर या बाळाचा फोटो ठेवून त्याखाली मिस यू असं लिहण्यात आलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते निलेश दास यांनी या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. या व्यक्तीने हा माझा भाचा असून त्याचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचं सांगितलं. (हेही वाचा - Pune: लोकप्रिय नृत्यांगना विशाखा काळे हिची गळफास घेऊन आत्महत्या; Coronavirus मुळे कार्यक्रम बंद, उत्पन्नाचे साधन नसल्याने आले होते नैराश्य)

परंतु, निलेश दास यांनी हे बाळ जिवंत असल्याचं सांगितलं. त्यानंतर बाळाच्या मामाने दास यांच्या म्हणण्याप्रमाणे, ससून रुग्णालयात धाव घेचली आणि बाळ जिवंत असल्याची खात्री केली. या सर्व प्रकारानंतर बाळाच्या मामाने आपल्या बहिणीच्या घरचा पत्ता पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांना संपर्क साधला. मात्र, सुरुवातीला बाळाच्या आई-वडिलांनी हे बाळ नसल्याचं म्हटलं. परंतु, मामा हे बाळ आपल्या बहिणीचेचं असल्याचं सांगितलं. (वाचा - पिंपरी चिंचवड मध्ये वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलीसच देणार नागरिकांच्या हातात बंदूक, वाचा काय आहे नेमकं प्रकरण)

या सर्व प्रकारानंतर बाळाला रस्त्यावर टाकून दिल्याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांविरोधा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या बाळाचे वडिल अभियंता आहेत. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पालकांनी बाळाला रस्त्यावर फेकून देण्यामागे नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.