Parag Milk Price Hike: सर्वसामान्यांना आणखी एक झटका Amul नंतर आता पराग दुधाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढले

पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले की, ऊर्जा, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि पशुखाद्याच्या किमतीत वाढ झाल्याने जवळपास 3 वर्षानंतर ही दरवाढ करण्यात येत आहे.

Parag Milk (PC - Twitter)

Parag Milk Price Hike: अमूल (Amul) पाठोपाठ आता पराग (Parag) चे दूधही महागले आहे. डेअरी फर्म पराग मिल्क फूड्स लिमिटेड (Parag Milk Foods Ltd) ने गोवर्धन ब्रँडच्या गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही वाढ आजपासून म्हणजेच मंगळवारपासून लागू झाली आहे. या वाढीनंतर गोवर्धन गोल्ड मिल्क (Gowardhan Gold Milk) चा दर 48 रुपयांवरून 50 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच गोवर्धन फ्रेश (Gowardhan fresh) चा भाव 46 रुपयांवरून 48 रुपयांवर पोहोचला आहे.

पराग मिल्क फूड्स लिमिटेडने मंगळवारी सांगितले की, वाढत्या किमतीमुळे त्यांनी 1 मार्चपासून गोवर्धन ब्रँडच्या गायीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. तत्पूर्वी, अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) सोमवारी मंगळवारपासून दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली. (वाचा - AMUL Milk: अमूलच्या दुधात 2 रुपयांची वाढ; उद्यापासून नवे दर लागू)

दरम्यान, वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे दुधाच्या किमतीत वाढ करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ही एक सहकारी संस्था आहे जी अमूल या ब्रँड नावाने दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ विकते.

पराग मिल्क यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरात वाढ झाल्याने गोवर्धन गोल्ड दुधाचे दर आता प्रतिलिटर 48 रुपयांवरून 50 रुपये होणार आहेत. तर गोवर्धन फ्रेशची किंमत आता 48 रुपये असेल, जी पूर्वी 46 रुपये प्रति लिटर होती.

पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले की, ऊर्जा, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि पशुखाद्याच्या किमतीत वाढ झाल्याने जवळपास 3 वर्षानंतर ही दरवाढ करण्यात येत आहे. एकूण दूध उत्पादन खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादकांनी सांगितले की, दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.

उन्हाळ्यात दुधाची मागणी वाढत असल्याने सतत दुधाचे उत्पादन होण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशी भरपाई मिळावी. या कठीण काळात शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी कंपनीने व्यापार सवलत आणि इतर खर्चात कपात केली आहे आणि यावेळी शेतकऱ्यांना उच्च वाढ दिली आहे.