IPL Auction 2025 Live

Air India पाठोपाठ मुंबई वरून उड्डाण करणार्‍या IndiGo च्या फ्लाईट 6E 1275, 6E 56 मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

आज सकाळी मुंबई हून निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच त्यांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरवलं आहे.

IndiGo Flight | (Photo Credit - ANI/X)

आज (14 ऑक्टोबर) पहाटे  एअर इंडिया च्या  मुंबई तून न्यूयॉर्क कडे झेपावलेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर असाच प्रकार इंडिगो च्या देखील दोन विमानात झाला आहे. flight 6E 56 या मुंबई जेहाद आणि 6E 1275 या मुंबई मस्कद विमानात देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली असल्याचं एअरलाईन्स कडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान इंडिगो (IndiGo) ने ही धमकी मिळताच प्रोटोकॉल नुसार पुढील कारवाई केल्याचं प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.

इंडिगो च्या विमानांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. त्यानंतर standard operating procedure च्या अंतर्गत विमानाची आणि प्रवाशांची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. याबाबत इंडिगो ने माहिती एका परिपत्रकाद्वारा दिली आहे.

आज सकाळी मुंबई हून निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच त्यांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरवलं आहे. त्यानंतर पुन्हा विमानाची, प्रवाशांची तपासणी झाली आहे. एअर इंडियाच्या माहितीनुसार सारे प्रवासी सुरक्षित आहेत. आज मुंबई हावडा मेल मध्ये देखील अशाच प्रकारे बॉम्ब ठेवल्याची धमकी समोर आली त्यानंतर 12809 ही मुंबई हावडा मेल एक्सप्रेस जळगाव स्थानकामध्ये थांबवण्यात आली. त्यानंतर ट्रेनची तपासणी करण्यात आली मात्र या ट्रेन मध्ये कोणतीच संदिग्ध वस्तू आढळलेली नाही.