Aditya Thackeray Visit BDD Chawl: आदित्य ठाकरे यांची वरळी येथील बीडीडी चाळीला भेट, पुनर्विकासाच्या कामाची पाहणी

या भेटीत त्यांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली.

Aditya Thackeray | Twitter

शिवसेना (UBT) पक्षाचे वरळी येथील आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज त्यांच्या मतदारसंघातील बीडीडी चाळीला भेट (Aditya Thackeray Visit BDD Chawl) दिली. या भेटीत त्यांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांनी या भेटीची माहिती ट्विटरद्वारेही दिली आहे. आदित्या ठाकरे हे शिवसेना (UBT) पक्षाचे युवा नेते आणि तरुण आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारमध्ये ते पर्यावरण आणि राजशिष्टाचार खात्याचे मंत्री होते. आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याने त्यांच्या काम करण्याची पद्धत, वेग आणि इतर सर्वच गोष्टींची जोरदार चर्चा होते.

आदित्य ठाकरे यांनी बीडीडी येथील पुनर्विकास प्रकल्पाला भेट दिल्यानंतर सांगितले की, वरळी येथील बीडीडी चाळीची कामे वेगाने व्हावीत यासाठी मी सतत लक्ष ठेऊन असतो. या ठिकाणी मी प्रत्येक महिन्याला भेट देत असतो. इथे नव्याने उभा राहणाऱ्या कामाची प्रगती मी आनुभवली आहे. अनुभवतो आहे. बीडीडी चाळीच्या पहिल्या टप्प्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली महाविकासआघाडी सरकानेर सुरु केले. बीडीडी चाळीतील हजारो कुटुंबांना सुमारे 500 चौरस फूटाचे घर मिळणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: उद्या लागणार एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल)

ट्विट

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बीडीडीचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा फोटो ट्विटरवर शेअर करत म्हटले आहे की, जुनी मुंबई आणि समोरच आकारास येणार पुनर्विकासाचा नवा प्रकल्प! फोटोत दिसणारी, आमच्या मागे असलेली इमारत 1924 मध्ये उभारण्यात आली होती. पुढच्या वर्षी तिला 100 वर्षे पूर्ण होतील. त्याचवेळी या इमारतीच्या अगदी समोरच बीडीडीच्या रहिवाशांसाठी नवी इमारत उभी राहील.