Ashish Mete Dies: आदिती तटकरेंचे PRO आशिष मेटे शतपावली घालताना कोसळले; अकस्मात मृत्यू

राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणून काम करणाऱ्या आशिष मेटे यांचा भांडूप येथे अचानक मृत्यू झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Ashish Mete Dies: आदिती तटकरेंचे PRO आशिष मेटे शतपावली घालताना कोसळले; अकस्मात मृत्यू
Aditi tatkare PRO Ashish Mete Dies

राज्याच्या महिला आणि बालविकास विभाग  मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून काम करणाऱ्या आशिष मेटे चा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भांडूप मध्ये आशिष रात्री जेवणानंतर इमारतीच्या आवारात शतपावली घालत असताना कोसळले आणि डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. परिसरातील लोकांनी लगेचच त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांकडून तपास सुरू

आशिष मेटे मृत्यू प्रकरणाची माहिती मिळताच भांडूप पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. आशिष मेटे यांचे शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, त्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी सांगितले की, सध्या तरी या प्रकरणात कोणतीही संशयास्पद बाब आढळलेली नाही. नक्की वाचा: रोहित पवार यांच्या पीए ची 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; घराजवळ आढळला मृतदेह 

आशिष मेटे कोण होते?

आशिष मेटे हे मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी थेट सरकारी सेवेत नव्हते, तर एका पब्लिक रिलेशन कंपनीच्या माध्यमातून बाह्य यंत्रणेद्वारे पीआरओ म्हणून काम पाहत होते. मंत्र्यांशी संबंधित प्रसिद्धी आणि जनसंपर्काची जबाबदारी ते सांभाळत होते.

कुटुंबीयांवर शोककळा

आशिष मेटे यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार शोकाकुल झाले आहेत. परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. अनेकांनी त्यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2026 05:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).