Aditi Tatkare, Pankaja Munde: अदिती तटकरे, पंकजा मुंडे यांच्यावर नवी जबाबदारी? राजकीय वर्तुळात चर्चा

अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दोन महिला नेत्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे की, अदिती तटकरे लवकरच गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री ( Gondia District Guardian Minister) होऊ शकतात. तर, दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांना भाजपकडून राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवले जाऊ शकते.

Aditi Tatkare, Pankaja Munde | (Photo credit: archived, edited, representative image)

अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दोन महिला नेत्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे की, अदिती तटकरे लवकरच गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री ( Gondia District Guardian Minister) होऊ शकतात. तर, दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांना भाजपकडून राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवले जाऊ शकते. धर्माराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) हे सध्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव ते हे पद सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागी तटकरे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार ठरवतील तो पालकमंत्री

धर्मराव बाबा आत्राम हे सध्या राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री आहेत. त्यांनी पालकमंत्री पद सोडण्याबाब उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना सांगितले असल्याचे समजते. मुहायुतीच्या जागावाटपानुसार हे गोंदियाचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे पक्ष ठरवेल तो गोंदियाचा पालकमंत्री होऊ शकतो. सध्यास्थितीत तर हे पद   अदिती तटकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रकृतीचे कारण आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्राम यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांवर विशेष लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, Bharat Gogawale Controversial Statement: अदिती तटकरे यांचे नाव येताच भरत गोगावले यांचे वादग्रस्त विधान; सत्तेची नशा की अतिउत्साही पणा? नागरिकांमध्ये चर्चा)

भाजपमध्ये फेरबदलाची शक्यता

दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दणदणीत पराभवानंतर भारतीय जनता पक्षातही मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. त्यामुळे राज्यातील नेतृत्वामध्येही फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच, नेतृत्वाच्या अधिकारांचेही विकेंद्रीकरण केले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय भाजपतर्फे घेतला जाऊ शकतो. (हेही वाचा, Maratha vs OBC: लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यातील ओबीसी समाजात तीव्र नाराजी; 2 समर्थकांची आत्महत्या)

पंकजा मुंडे यांना राजकीय संधी?

पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात नुकताच पराभव झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावने यांनी त्यांचा पराभव केला. पंकजा यांना विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये सलग पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पक्षातही त्यांच्या पराभवाबद्दल नाराजी आहे. पंजा मुंडे यांना राजकारणात डावलले गेल्याची भावना त्यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचाही फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे जाणकारांचे म्हणने आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवून डॅमेज कंट्रोल केले जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

दरम्यान, पंकजा मुंडे काय किंवा अदिती तटकरे काय यांना पद मिळाल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घराणेशाही असल्याचा आरोप होऊ शकतो. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाला निर्णय घेताना काळजीपूर्वकच घ्यावा लागणार आहे. निर्णय काही असला तरी तो कार्यकर्त्यांनाही पटवून द्यावा लागणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now