Badlapur Sexual Assault: बदलापूर प्रकरणातील आरोपी Akshay Shinde Encounter बाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचर प्रकरणातील (Badlapur Sexual Assault Case) मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीमध्ये मारला (Akshay Shinde Encounter) गेला.

Akshay Shinde Encounter | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बदलापूर लैंगिक अत्याचर प्रकरण (Badlapur Sexual Assault Case) देशभरात गाजत आहे. आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir Badlapur) शाळेत घडलेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीमध्ये मारला (Akshay Shinde Encounter) गेला. ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे सोमवारी (23 सप्टेंबर) ही घटना घडली. या घटनेनंर राज्याच्या सर्वच स्थरांमध्ये खळबळ उडालील असून, सत्ताधारी आणि विरोधक असा प्रश्नोत्तरांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी वर्गाकडून या एन्काऊंटरचे जोरदार समर्थन करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला आरोपीचा मृत्यू झाला यामध्ये दु:ख नाही. मात्र, तो ज्या पद्धतीने झाला की, घडवून आणला याबाबत अनेक प्रश्न विचारत विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिसांनी दाखविलेला हालगर्जीपणा संशयास्पद- शरद पवार

बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली आहे. (हेही वाचा, Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर झाडली गोळी; उपचारादरम्यान मृत्यू)

'आरोपीला कायद्याच्या चौकटीतून न्याय मिळायला हवा होता'

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बोगस

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय याचा पोलीस चकमकीत झालेला मृत्यू हा अनेक संशय निर्माण करणारा आहे. त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना तो मारला गेला. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवरच कथीतरित्या हल्ला केला, असे सांगण्यात आले. मात्र, हे संपूर्ण एन्काऊंटरच बोगस आहे. या प्रकरणातील इतर प्रमुख आरोपींना वाचविण्यासाठी हे सर्व प्रकरण घडवून आणले. पोलिसांनी जाणीवपूर्वकच हे घडवून आणले अशी जोरदार टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: अक्षय शिंदे याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड, कुटुंबीयांनाही मारहाण; आरोपीच्या आईवडिलांचा दावा)

‘एन्काऊंटर’ने न्याय ही केवळ धूळफेक- अमोल कोल्हे

आदर्श विद्या मंदिर बदलापूर शाळेतील प्रकरणावर बोलताना,  एखाद्या आरोपीचा पोलीस चकमकीत मृत्यू घडवून आणणे म्हणजे पीडिताला न्याय मिळाला असे जर कोणाला वाट असेल तर ती केवळ धूळफेक आहे. दस्तुरखुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात पाठिमागील 6 महिन्यांमध्ये 213 भगिनींवर अत्याचार झाले आहेत. बदलापूर प्रकरणात मुख्य आरोपींवर गुन्हा नोंदवताना घडलेली चालढकलसुद्धा याला कारणीभूत आहे. या एन्काऊंटर प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहेत.

'बदला…पुरा' अमित ठाकरे यांची शब्दिक कोटी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरुन लिहिलील्या फेसबूक पोस्टमध्ये 'बदला पुरा' असे म्हटले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची बातमी नुकतीच वृत्तवाहिन्यांवर पाहिली. एन्काउंटर कसा झाला, कोणी केला, यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार मनात न येता, पहिला विचार जो आला, तो एकच… त्या पीडित मुलींना अखेर न्याय मिळाला… या विषयावर विविध राजकीय पक्षांचे अनेक राजकारणी, नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने भूमिका मांडतील. एन्काउंटरच्या निमित्ताने सरकारला कोंडीत पकडण्याचेही प्रयत्न होतील. अक्षय शिंदे पोलिसांवर हल्ला करूच शकत नाही, पोलिसांनीच कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याचा बळी घेतला, असे अनेक तर्कवितर्क लढवले जातील. परंतु, जो माणूस लहान मुलींवर अत्याचार करतो, त्याची बाजू कोणी कशी काय घेऊ शकतं? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

आरोपींची बाजू कोण घेऊ शकतं?

दरम्यान, राज्य सरकारकडून अक्षय शिंदे याच्या मृत्यूबद्दल कितीही समर्थन केले जात असले तरी, त्यामुळे मूळ प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्याला घेऊन जात असताना पोलिसांनी योग्य काळजी घेतली होती का? त्याने खरोखरच पोलिसांवर हल्ला केला की, तो ज्या शाळेत कामाला होता तेथील अनेक गुपीते दडपण्यासाठी त्याचा मृत्यू घडवून आणला असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.