Mumbai Crime News: कर्जाच आमिष दाखवत विवाहित महिलेवर सावकाराने केला बलात्कार, दादरमधील धक्कादायक घटनामुळे परिसर हादरलं

सावकाराने पीडित तरुणाच्या पत्नीला फोन करत १२ लाख रुपयांच्या कर्जाचं आमिष देत भेटण्यासाठी बोलावलं. आणि तीच्यावर बलात्कार केला.

Raped (representationla image)

Mumbai Crime News: मुबंईतील दादर (Dadar) परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्जाचं (Loan) आमिष दाखवत मुंबईतील विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दादरमधील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी सावकराने कर्जदाराच्या पत्नीवर सातत्याने दोन वर्ष बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आरोपी सावकराने बलात्कारावेळी पीडीत महिलेचे व्हिडिओ शुट (Video Shoot) करत ब्लॅकमेल करत सतत अत्याचार केला आहे.

महिलेने आणि त्याच्या पतीने या धक्कादायक घटनेचे मुंबई पोलीसांत तक्रार केली आहे. पोलीसांनी सावकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडीत महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरु केली आहे. हा प्रकार दादर येथील असूनही पोलिस या संदर्भात जोरदार कंबर कसून चौकशी करत आहे. दादरमधील सावकार गिरिश वरळीकर या व्यक्तीकडून तीन रुपये टक्क्यांनी पाच रुपयांच कर्ज सुरुवातीला घेतल त्यानंतर त्यांने पीडीत महिलेला फोन करत १२ लाक रुपयांच्या कर्जाचं आमिष दाखवलं तीला भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर आरोपीने वांद्रे आणि खार येथील एका हॉटेल मध्ये बोलावलं

तीच्यावर बलात्कार केला आणि त्यानं तीचा व्हिडिओ देखील शुट केला. तीला धमकी देत सतत तिच्यावर अत्याचार केला. पीडिताने पोलीसांना माहिती दिलेल्यानुसार त्याने तीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. त्यांना कर्जांचा गंडा लावला आणि सतत त्रास दिला. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. आरोपीविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे व्हिडिओ आहे की नाही याकरीता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement