Mumbai Accident: विलेपार्ले येथे भरधाव बेस्ट बसची धडक, तरुणाचा अपघाती मृत्यू

दिवसेंदिवस मुंबईत अपघाताची नोंद वाढत चालली आहे. मुबंईतील विलेपार्ले पूर्व येथे बेस्ट बसच्या धडकेत 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी 5 जून रोजी घडली.

Mumbai Accident: विलेपार्ले येथे भरधाव बेस्ट बसची धडक, तरुणाचा अपघाती मृत्यू
Road Accident

Mumbai Accident: दिवसेंदिवस मुंबईत अपघाताची नोंद वाढत चालली आहे. मुबंईतील विलेपार्ले पूर्व येथे बेस्ट बसच्या धडकेत 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी 5 जून रोजी घडली. नेहरू रोडवर हा घडला होता. या प्रकरणी बस चालक याला पोलिसांनी अटक केले आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. बसने समोरून येणाऱ्या व्यक्तीला धडक दिली होती. (हेही वाचा- होर्डिंग कोसळल्याने 62 वर्षीय व्यक्ती जखमी, मालाड येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल)

मिळलेल्या माहितीनुसार, बेस्ट बस वरळीहून सीप्झ अंधेरी पूर्वेकडे जात होती. त्यावेळीस विलेपार्ले येथील नेहरू रोडवर हा अपघात झाला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी चालक राहुल कांबळे (44) याला अटक करण्यात आले आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली.

बसची धडक इतकी भीषण होती की, रस्त्यावरून जात असाताना एका पादचारीने जीव गमावला. प्रदाम सिंह असं अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच, मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला. प्रदाम सिंह रस्त्याने चालत असताना, मागून बेस्ट बसने धडक दिली.

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2024 09:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).