Satara Accident: सातारा-महाबळेश्वर रोडवर अपघात; भरधाव कार वेण्णा नदीत कोसळली (Watch Video)
अपघातावेळी कारमध्ये चौघे जण होते.
Satara Accident: सातारा जिल्ह्यात अपघात घडला ज्यात एक कार सातारा-महाबळेश्वर रोडवरील(Satara Mahabaleshwar Road) वेण्णा नदीपात्रात कोसळली. अपघातावेळी कारमध्ये चौघे जण होते. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.मात्र, कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली (Car falls Into Venna River )असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंबेघर गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींची नावे अद्याप समोर आली नाहीत. (हेही वाचा:Sharad Pawar Convoy Accident: पुण्यात शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक; मदत न गेल्याने गाडी पुढे गेली गाडी, व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video) )
पोस्ट पहा
काल शरद पवार यांच्या ताफ्या मधील एका गाडीची धडक बसल्याने दुचाकीला अपघात झाला होता. पुण्यामध्ये मोदी बाग परिसरामधील घटना आहे. शरद पवार बाहेर पडल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील गाडीचा धक्का मागून येणार्या एका दुचाकीस्वाराला बसला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला. दरम्यान या धडकेनंतर ताफ्यातील गाडीमधून कोणीही बाहेर आलं नाही आणि दुचाकीस्वाराला मदतही कोणी न केल्याने त्याची चर्चा अधिक होत आहे. बाईक चालकाला यामध्ये किरकोळ दुखापत झाली आहे.