Pune-Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; भरधाव ट्रकची कारला धडक; एक ठार, 3 जखमी (Watch Video)
या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. महामार्गावरील सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार 21 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला.
Pune-Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मागून येणाऱ्या डंपर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकीला वाहनाला धडक दिली. या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. महामार्गावरील सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार 21 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला.
व्हिडिओमध्ये अपघातावेळी ट्रक भरधाव वेगाने जात असल्याचं दिसत आहे. या अपघातात एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा -Sangli Accident: वऱ्हाड घेवून निघालेल्या गाडीचा सांगलीत भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू)
पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ -
A tragic accident occurred on the Pune-Solapur Highway where a speeding truck rammed into a car parked at roadside
The accident in walhari village, resulting in death of a 30 year old man while other three sustained injuries pic.twitter.com/XVELu2MnrT
— Vinay Tiwari (@vinaytiwari9697) August 24, 2024
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक डंपर ट्रक भरधाव वेगाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या चारचाकीकडे जाताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेला आणि वाहनाजवळ इतरांसोबत उभा असलेला एक व्यक्ती जवळ येत असलेल्या ट्रकची दखल घेऊन पटकन पळून जातो. परंतु, काही सेकंदातच ट्रक पांढऱ्या कारला येऊन धडकतो. यामुळे गाडीच्या बोनेटसमोर उभ्या असलेल्या तीन लोकांनाही डंपरची धडक बसते. हा अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. (हेही वाचा - Pimpri Chinchwad Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत ऑन ड्युटी पोलिस हवालदाराचा अपघाती मृत्यू)
पुणे-सोलापूर महामार्गावरील वल्हारी गावात अपघात -
पुणे-सोलापूर महामार्गावरील वल्हारी गावात हा अपघात झाला. कारमधील प्रवासी पुण्याहून अक्कलकोट यात्रेला जात होते. मात्र वाटेत कारचे इंजिन बिघडल्याने त्यांनी कार थांबवून रस्त्याच्या कडेला उभी केली. या अपघाताबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2024 02:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

