Virar To Churchgate AC Local Viral Video: खचाखच भरलेली एसी लोकल मीरारोड स्थानकातून दरवाजा बंद न करताच धावली; व्हिडीओ वायरल (Watch Video)

मीडीया रिपोर्ट्सनुसार, तांत्रिक दोषामुळे एका दरवाज्यामध्ये हा प्रकार घडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे

AC Local | Twitter/Diwakar_singh31

मुंबई लोकल (Mumbai Local) ही या शहराची लाईफलाईन आहे. ऊन, पाऊस, वार्‍यामध्ये मुंबईकरांना रस्त्यावरील ट्राफिक मध्ये अडकून न पडता वेगवान प्रवासाचा पर्याय म्हणजे लोकल ट्रेन्स. पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर सकाळच्या वेळेत एसी लोकल (AC Local) देखील खचाखच भरून चालत असतात. आज 23 मार्च सकाळी विरार चर्चगेट दरम्यान धावणारी लोकल चक्क दरवाजे बंद न करता धावली. सोशल मीडीयामध्ये सध्या या घटनेचे फोटो, व्हिडिओ वायरल झाले आहेत. दरम्यान प्रवाशांचा जीव यामुळे काही काळ धोक्यात आला होता पण काही वेळातच हा तांत्रिक बिघाड दुरूस्तही झाला आणि मोठा अनर्थ टळला आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, तांत्रिक दोषामुळे एका दरवाज्यामध्ये हा प्रकार घडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. Diwakar Singh ट्वीटर युजरने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये ही घटना मीरा रोड स्थानकातील सकाळी 7.56 ची असल्याची माहिती आहे. दहिसर स्थानकात गेल्यानंतर प्रवाशांनीच दरवाजा थोडा नीट केला आणि पुन्हा ट्रेनचे दरवाजे व्यवस्थित बंद झाले. नक्की वाचा: Mumbai AC Local: स्टेशन आलं पण एसी लोकलचं दार उघडलचं नाही, संतापात पुढच्या स्टेशनला प्रवाशांना मोटरमॅनला कोंडलं.

पहा ट्वीट

दरम्यान FPJ सोबत बोलताना पश्चिम रेल्वेचे Chief Public Relations Officer, Sumit Thakur यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हा प्रकार 'एसी लोकलचा दरवाजा प्रवाशांच्या गर्दीने मीरारोड स्टेशन मध्ये अडला गेल्याने' झाल्याचं म्हटलं आहे. प्रवाशांनी चढता-उतरताना एसी लोकलचे दरवाजे अडवण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे तांत्रिक त्रृटी निर्माण होतात आणि विनाकारण ट्रेन उशिराने धावतात परिणामी काहींना नाहक त्रास सहन करावा लागतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now