Builder Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर ईडीची पुन्हा कारवाई, चार कोटींची संपत्ती जप्त
ईडीने (Enforcement Directorate) कारवाई करत त्यांची चार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्यावर संक्तवसुली संचालनालायने पुन्हा एकदा कारवाई केली आहे. ईडीने (Enforcement Directorate) कारवाई करत त्यांची चार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अविनाश भोसले (Avinash Bhosale) आणि त्यांचा मुलगा अमित पाठिमागील काही दिवसांपासून रडारवर आहेत. ईडी (ED) ने काही दिवसांपूर्वीच बिल्डर अविनाश भोसले यांची 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा इडीने ही कारवाई केली आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ईडीने अविनाश भोसले यांच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची जागा ताब्यात घेतली आहे. पुणे येथील सरकारी जागेवर बांधकाम केलेप्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या जमीनीच्या जाेवरुन गुन्हा दाखल झाला ती जागा पुणे येथील गणेशखिंड रस्त्यावरील रेंज हिल कॉर्नरम, प्लॉन नंबर 2, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्था स्थित आहे. (हेही वाचा, Builder Avinash Bhosale: बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त, इडीची कारवाई)
दरम्यान, या पूर्वी विदेशी चलन गैरव्यवहार प्रकरणात इडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची मिळून 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये विविध कंपन्यांचे समभाग, विविध शहरांमधील गुंतवणूक, मालमत्ता तसेच, पुणे येथील क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत असले्या पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. हॉटेल वेस्टिन- पुणे (Hotel Westin, Pune), हॉटेल ले मेरिडियन- नागपूर (Hotel Le Meridian), हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा ( Hotel W Retreat and Spa, Goa) अशी या हॉटेल्सची नावे आहेत.
एएनआय ट्विट
ईडीकडून अविनाश भोसले यांची ‘फेमा’(फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट 1999) कायद्यांतर्गत चौकशी सुरु आहे. ही चौकशी 2017 पासून सुरु आहे. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (ABL) ही कंपनी अविनाश भोसले यांच्या मालकीची आहे. या कंपनीच्या आणि अविनाश भोसले यांच्या कुटुंबीयांच्या नावे एका बँकेच्या खात्यावर 15 लाख रुपये इतकी रक्कम ठेव म्हणून ठेवण्यात आली आहे. परकीय चलन व्यवहारामध्ये भोसले यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुरु असलेल्या चौकषीत भोसेले यांनी उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यानंतर भोसले यांच्या नावावर असलेली ४० कोटी ४३ लाखांची मालमत्ता सोमवार दिन 21 जून 2021 या दिवशी जप्त करण्यात आली होती. दरम्यान, इडीने भोसले यांच्यावर नजीकच्या काळात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.