Aarey Protest: आरेतील वृक्षतोडीला विरोध कायम; पर्यावरण प्रेमींकडून दुसऱ्या दिवशीही अंदोलन सुरुच

या विरोधात पर्यावरण प्रेमींकडूनही 'आरे बचाव' अंदोलन (Aarey Protest) सुरुच ठेवण्यात आले आहे.

Mumbai Police detaining protesters at Aarey colony | (Photo Credits: PTI)

Aarey Protest 2nd Day:मुंबईच्या (Mumbai) आरे कॉलोनीमध्ये (Aarey colony) शुक्रवार रात्रीपासून वृक्षतोडीचे काम सुरु करण्यात आले आहे. या विरोधात पर्यावरण प्रेमींकडूनही 'आरे बचाव' अंदोलन (Aarey Protest) सुरुच ठेवण्यात आले आहे. अंदोलन करणाऱ्यांपैकी 29 निदर्शकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढेच नव्हे डोंबीवलीतील सत्र न्यायालायाकडून या 29  जणांना न्यायालयीन कोठडीही सुनावली आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर निर्दशकांनी नाराजी व्यक्त करत सलग दुसऱ्या दिवशीही (Aarey Protest 2nd Day) त्यांचे अंदोलन सुरुच ठेवले आहे. न्यायालयाने मेट्रो-03  बाजूने निर्णय दिल्याने आरेतील संघर्षाने अधिकच पेट घेतल्याची समजत आहे. तसेच या महत्वपूर्ण लढाईत अनेक राजकीय नेते 'आरे बचाव' मोहिमेला पाठिंबा देत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी आरे हे जंगल नाही असे म्हणत आरे येथील वृक्ष तोडीला परवानगी दिली होती, ज्यांनंतर काल रात्रीच आरे मधील क्षशेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करत पर्यावरण प्रेमींनी शुक्रवारी रात्री आरेतील जंगलाकडे धाव घेवून मेट्रो-03 विरोधात अंदोलनाला सुरुवात केली होती. आज या अंदोलनाचा सलग दुसरा दिवस असून पर्यावरण प्रेमींकडून वृक्षतोडीला विरोध कायम आहे. या प्रकरणातून मोठा वाद निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी सकाळपासून आरे परिसरात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Aarey Protest: आरे वृक्षतोडी प्रकरणी पोलिस ताब्यात असलेल्या 29 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी; बोरीवली कोर्टाचा निर्णय

मेट्रो 03 च्या प्रकल्पासाठी आरेतील 2 हजारहून अधिक झाडे तोडण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर आक्षेप घेत पर्यावरण प्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. परंतु 4 ऑक्टोबरला न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि भारती यांच्या खंडपीठातून 'आरे हे जंगल नाही' असे म्हणत मेट्रोच्या बाजूने निर्णय दिला आहे.