आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान नाही; ऐवजी देणार 'ही' टॉप भूमिका - सूत्र

विधानसभा निवडणुक निकालाच्या (Maharashtra Vidhansabha Result) सुरुवातीपासून ज्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासाठी शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा तगादा लावला होता, त्या आदित्यचा मात्र या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये समावेश नसणार आहे

Aditya Thackeray, Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook, PTI)

मागील, महिन्याभराहून अधिक काळ सुरु असणार महाराष्ट्र सत्ता संघर्ष ट्विस्ट अँड टर्न्स नंतर आता अखेरीस,राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याचे निश्चित झालंय. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना (Shivsena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला असून आज, 28 नोव्हेंबर रोजी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच आज आठ शिवसेना आमदार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आश्चर्य म्हणजे विधानसभा निवडणुक निकालाच्या (Maharashtra Vidhansabha Result) सुरुवातीपासून ज्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासाठी शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा तगादा लावला होता, त्या आदित्यचा मात्र या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये समावेश नसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्यला जरी मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरी पक्षाच्या टॉप टीम मध्ये त्याला स्थान देण्यात येणार असून 'Shadow CM' म्ह्णून तो सर्वत्र दिसून येणार आहे.

शिवसेनेच्या काही नेत्यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत. "एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती मंत्रिमंडळात असतील तर त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर नक्कीच परिणाम होऊ शकतो, आणि म्हणूनच आदित्यला प्रत्यक्ष मंत्रिमंडळात समाविष्ट न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं म्हंटल आहे. मात्र तरीही पक्षाच्या वरच्या श्रेणीत तो सक्रिय असेल हे निश्चित असेही या नेत्यांनी सांगितले आहे. "पक्षीय स्तरावर कार्यरत राहून 29 वर्षीय आदित्य ठाकरे जनतेशी संपर्क साधू शकतात त्यांच्या समस्या सोडवू शकतात आपला पक्ष वाढवण्यासाठी राज्यभर दौरा करत पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आदित्यला देखील आपले कौशल्य विकसित करता येईल असा विश्वास देखील या नेते मंडळींनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे याने वरळी विधानसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे.संपूर्ण ठाकरे कुटुंबातील आदित्य हा पहिला निवडून आलेला आमदार आहे. 27 नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे याने अन्य आमदरांसह आपल्या विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. Uddhav Thackeray Oath Taking Ceremony Live Updates: बाळासाहेब थोरात शिवतीर्थावर दाखल; शपथविधी तयारीचा घेतला आढावा

दरम्यान, आज, 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवतीर्थावर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी दिग्गज नेतेमंडळींसहित, सामान्य नागरिक तसेच शेतकरी इत्यादी अनेकांना आमंत्रण आहे. या वेळी तब्बल 70 हजार हजाराची आसनव्यवस्था असून सुव्यवस्थेसाठी 2000 पोलिसांचा फाटा सज्ज करण्यात आला आहे, यावरूनच आपल्याला या कार्यक्रमाच्या भव्यतेचा अंदाज येऊ शकतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif