आदित्य ठाकरे व सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट; उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी दिले खास निमंत्रण
या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) स्वतः सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना निमंत्रित करण्यासाठी दिल्लीला पोहचले आहेत. आज संध्याकाळीच आदित्य ठाकरे दिल्लीकडे रवाना झाले होते.
अखेर सत्ता स्थापनेचा पेच सुटून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) रूपाने प्रथमच ठाकरे घराण्यातील सदस्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी (Chief Minister Maharashtra) विराजमान होणार आहे. उद्या शिवतीर्थावर मोठ्या शपथ विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा शपथविधी उद्या संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील तमाम नेत्यांना आमंत्रित केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) स्वतः सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना निमंत्रित करण्यासाठी दिल्लीला पोहचले आहेत. आज संध्याकाळीच आदित्य ठाकरे दिल्लीकडे रवाना झाले होते.
सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधी यांनीही मोठी भूमिका बजावली होती. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांचा शब्द प्रमाण होता. आता त्यांनी उद्याच्या शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी म्हणून स्वतः आदित्य ठाकरे राजधानी दिल्ली येथे त्यांना भेटले. सोनियाजी व राहुलजी यांना निमंत्रण दिल्यानंतर ते आता मनमोहन सिंह यांनाही निमंत्रित करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या बैठकीबद्दल बोलताना, 'ही भेट अतिशय सकारात्मक झाली' अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. (हेही वाचा: उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला सोनिया गांधी, राहुल गांधी, राज ठाकरे यांच्यासह या दिग्गज नेत्यांना दिले आमंत्रण
दरम्यान, कॉंग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्यासाठी कॉंग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, एमके स्टालिन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. शिवतीर्थावर पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी सहा हजार चौरस फुटांचे व्यासपीठ उभारले जाणार आहे. यावर जवळजवळ 100 लोक बसू शकतिक इतक्या खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे. या शपथविधीसाठी नयनरम्य सेट उभारण्यासाठी सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.