Aaditya Thackeray, Ajit Pawar: आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यामुळे मविआला गवसली विजयाची किल्ली? कसब्यात काँग्रेस उमेदवार Ravindra Dhangerkar यांचा विजय

महाविकासआघाडीने दाखवलेली एकी. काँग्रेसने दिलेला योग्य उमेदार आणि प्रचारात आणलेले मुद्दे अशा एक ना अनेक मुद्दयांनी ही निवडणूक गाजल्याचे सांगितले गेले. यात एक मुद्दा असाही पुढे आला की, आदित्य ठाकरे (Ajit Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची भूमिका आणि मांडणी या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची ठरली.

Aaditya Thackeray, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited)

कसबा विधानसभा (Kasba By-election) पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीतर्फे रिंगणात उतरलेला काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangerkar) यांचा दमदार विजय झाला. या विजयामुळे भाजपला जोरदार धोबिपछाड मिळाला. दरम्यान, या निवडणुकीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. यात महाविकासआघाडीने दाखवलेली एकी. काँग्रेसने दिलेला योग्य उमेदार आणि प्रचारात आणलेले मुद्दे अशा एक ना अनेक मुद्दयांनी ही निवडणूक गाजल्याचे सांगितले गेले. यात एक मुद्दा असाही पुढे आला की, आदित्य ठाकरे (Ajit Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची भूमिका आणि मांडणी या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची ठरली.

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला बहाल झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना अधिक आक्रमक झाली. कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारातही आदित्य ठाकरे यांनी जोरदार महत्त्वाची भूमिका निभावली. याशिवाय आदित्य ठाकरे यांनी या प्रचारात अत्यंत घणाघाती भाषण केले. विविध मुद्द्यांवरुन आदित्य ठाकरे यांनी सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांमधूनही जोरदार प्रतिसाद मिळत होता. परिणामी त्याचा फायदा मविआ उमेदवाराला झाला. (हेही वाचा, बालेकिल्ल्यात भाजप चारीमुंड्या चीत; रविंद्र धंगेकर विजयी, भाजपचे हेमंत रासने पराभूत, CM एकनाथ शिंदे, डीसीएम देवेंद्र फडणवीस यांना धक्का)

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचने नेत अजित पवार यांनीही कसबा पोटनिवडणुकीत जातीने लक्ष घातले. प्रमुख नेते असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही नेत्यांना सोबत घेऊन संपर्कातील जुन्या नव्या नेत्यांचीही एकत्र मोट बांधत आपला सर्व अनुभव पणाला लावाल. यासोबतच त्यांनी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशीही अत्यंत व्यवस्थापकीय पद्धतीने जुळवून घेतले. सर्व गणिते बरोबर जमवून आणली ज्याचा फायदा विजयासाठी झाला.

काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्याने काँग्रेस नेते प्रचाराला येणार हे सहाजिकच होते. तरीही कधी नव्हे तो एकोपा काँग्रेस नेत्यांनी या निवडणुकीत दर्शवला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुनील केदार, सुनील राऊत यांच्यासह अनेक नेते काँग्रेससाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Maharashtra Guardian Ministers List: महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? वाचा संपूर्ण लिस्ट

Amravati Shocker: आधी लोखंडी सळ्यांचे चटके...मग लघवी पाजली, कुत्र्याची विष्ठा खायला लावली; काळी जादू केल्याच्या आरोपावरून 77 वर्षीय आदिवासी महिलेला गावकऱ्यांकडून मारहाण

Delhi Assembly Election 2025: महिलांसाठी 2500 रुपये, LPG सिलेंडरवर 500 रुपयांचे अनुदान; दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा सादर

Aditya Thackeray On Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे यांची राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा

Share Now