IPL Auction 2025 Live

Thane Accident: ठाणे येथे एका ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक; दुचाकीस्वराचा मृत्यू

या दुर्घटनेत दुचाकीस्वराचा मृत्यू झाला आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी घडली आहे.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

एका ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दुचाकीस्वराचा मृत्यू झाला आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कळवा पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याचाही तपास केला जात आहे. या घटनेने आजुबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय ट्रक चालकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

अजयकुमार नरेंद्रनाथ तिवारी असे दुचाकीस्वराचे नाव आहे. अजयकुमार हे ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, अजयकुमार हे 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खारेगाव खाडी पुलावरून जात होते. मात्र, त्याचवेळी अजयकुमार यांच्या मागून आलेल्या एका भरघाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामुळे अजितकुमार गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हे देखील वाचा- Tigress Captured In Yavatmal: यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

तसेच, पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी बालेवाडी येथे एका मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार भरधाव चालवत एका निवृत्त पोलीस निरिक्षकाने दुचाकी स्वाराला धडक दिली. ही धडक इतकी भयावह होती की, दुचाकी स्वार सुमारे 100 मीटर दूर फरफटत गेला होता. या अपघातात एक जण जागीच ठार झाला होता. तर , इतर 5 जण जखमी झाले होते.