Mumbai: खारमध्ये दोन खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून ज्येष्ठ नागरिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक

पॉलिसी दस्तऐवजांमध्ये त्यांची किंवा त्यांच्या पत्नीची संपर्क माहिती समाविष्ट नसल्याचं पीडित व्यक्तीला आढळलं.

Fraud (Photo Credits: IANS) | Representational Image

Mumbai: खार पोलिसांनी (Khar Police) एका खाजगी बँकेच्या दोन कर्मचार्‍यांविरुद्ध एका ज्येष्ठ नागरिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त प्रकाशित केलं आहे. पीडित व्यक्ती हा त्याच्या पत्नीसोबत राहतो. तक्रारीनुसार, बँकेच्या व्यवस्थापकाने पीडित व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला जून 2021 मध्ये विमा पॉलिसीबद्दल सांगितले.पॉलिसी सात वर्षांसाठी होती आणि जोडप्याला प्रति वर्ष ₹8 लाख करमुक्त व्याज देण्याचे वचन दिले होते. तथापि, त्यांना प्रत्येकी 40 लाख गुंतवावे लागतील असं सांगण्यात आलं होतं.

फेब्रुवारी 2023 मध्ये, एका मित्राने ज्येष्ठ नागरिकाला पॉलिसीच्या तपशीलांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करण्याचा सल्ला दिला. पॉलिसी दस्तऐवजांमध्ये त्यांची किंवा त्यांच्या पत्नीची संपर्क माहिती समाविष्ट नसल्याचं पीडित व्यक्तीला आढळलं. जोडप्याचे वार्षिक उत्पन्न 72 लाख असे चुकीचे नमूद केल्याचे पाहून या जोडप्याला धक्का बसला. (हेही वाचा - New Education Policy Rollout in Maharashtra: नवीन शैक्षणिक धोरण येत्या जून पासून लागू होणार, इंजिनियरिंगचे धडे मराठी भाषेतून मिळणार; दीपक केसरकर यांची माहिती)

याशिवाय, त्याच्या घरकाम करणाऱ्याला त्यांची नातवंडे म्हणून चुकीची ओळख सांगण्यात आली होती. तसेच जोडप्याच्या मृत्यूनंतर विमा प्रीमियम भरण्यास ते बांधील असतील, असंही त्यात म्हटलं होतं.

या सर्व प्रकारामुळे जोडप्याला मोठा धक्का बसला. पॉलिसीचा कोणालाही फायदा होणार नाही. तसेच पीडित व्यक्तीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही पॉलिसी तयार केली गेली होती. या सर्व प्रकारानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनेची दखल घेत बँकेतील कर्मचाऱ्याच्या विरोधात 7 एप्रिल रोजी एफआयआर नोंदवला.