नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागपूर, घाटकोपर येथे रॅलीचे आयोजन, देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा सहभाग
या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभागी घेतला आहे. त्याचसोबत लोक अधिकार मंच यांच्यासह भाजप आणि आरएसएस यांनी सुद्धा या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात लोक अधिकार मंचाने रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभागी घेतला आहे. त्याचसोबत लोक अधिकार मंच यांच्यासह भाजप आणि आरएसएस यांनी सुद्धा या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरच्या रॅलीत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. ही रॅली यशवंत स्टेडिअम- संविधान चौका पर्यंत काढण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील घाटकोपर येथे ही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात रॅली काढण्यात आली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी रॅलीत सहभागी होत प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणत्याही धर्माच्या व जातीच्या विरोधी जाणारा नाही. परंतु काही राजकीय पक्ष आणि लोकांद्वारे गैरसमज पसरवण्यात येत आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले असल्याचे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.
तर गुरुवारी नागपूरात जमाते इस्लामी हिंद आणि भारतीय मुस्लिम परिषद यांच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये आझादी आणि महात्मा गांधी जिंदाबाद अशा घोषणा करण्यात आल्या. तर अद्याप नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जोरदार आंदोलन केली जात आहेत.तसेच परभणी येथे या काद्याला विरोधत करत हिंसाचाराची भुमिका आंदोलकांनी घेतली. यामध्ये सरकारी मालमत्तेची नासधूस, दंगल घडवणे किंवा दगड फेकणे या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनात ज्यांनी कायदा हाती घेतला आहे त्यांच्या विरोधात कारवाई होणारच असे पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आले आहे. परभणी येथील काही भागात बंदची हाक देण्यात आली होती. तसेच मोर्चा सुद्धा काढला होता. मात्र मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याची मागणी करण्यास आंदोलकांनी सुरुवात केली. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.(CAA ला शरद पवार यांचा विरोध; एल्गार परिषदेच्या कारवाईची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी)
ANI Tweet:
हिंगोलीत सुद्धा दगड फेकीमध्ये 150 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 20 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बीड येथे सुद्धा आंदोलनाने हिंसक वळण घेत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यासोबत दगडफेक केली. या ठिकाणहून 103 जणांना अटक आणि 103 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.