Pune: महिला वकिलांना कोर्टरूममध्ये केस व्यवस्थित करण्यास मनाई; पुणे जिल्हा न्यायालयात लावण्यात आली नोटीस
त्यानंतर ही नोटीस काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निबंधकांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
Pune District Court: महिला वकिलांना कोर्टरूममध्ये केस घालण्यास मनाई केल्याची नोटीस पुणे जिल्हा न्यायालयात (Pune District Court) लावण्यात आली आहे. कारण त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा येत आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी या नोटिशीचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. त्यानंतर ही नोटीस काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निबंधकांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
दरम्यान, 20 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसवर रजिस्ट्रारची सही आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नोटिशीच्या छायाचित्रांनुसार, "अनेकदा असे दिसून आले आहे की महिला वकील कोर्टरूममध्ये केस व्यवस्थित करतात, ज्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा येतो. त्यामुळे महिला वकिलांनी असे काम करू नये यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे." (हेही वाचा - Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी प्रदीप भालेकर नावाच्या व्यक्तीविरोधात FIR दाखल)
मंगळवारी जयसिंग यांनी ट्विटरवर म्हटले की, "अखेर यश मिळाले. नोटीस मागे घेण्यात आली आहे.” पुणे न्यायालयाच्या रजिस्ट्रारशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला या विषयावर काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी पीटीआयला सांगितले.