Mumbai Accident: भरधाव रिक्षाने पादचाऱ्याच्या चिरडले, घटनेचा CCTV फुटेज व्हायरल

या घटनेत भरधाव वेगाने येणाऱ्या ऑटोरिक्षाने धडक दिल्याने एका पादचाऱ्याने आपला जीव गमवावा लागला आहे.

Bandra accident PC TW

Mumbai Accident: मुंबईतील वांद्रा  (Bandra ) परिसरात सोमवारी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत भरधाव वेगाने येणाऱ्या ऑटोरिक्षाने (Auto Riksha) धडक दिल्याने एका पादचाऱ्याने आपला जीव गमवावा लागला आहे. तर आणखी एक जण जखमी झाला आहे. ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही  (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराचवेळ गोंधळ निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात अपघाताची मालिका सुरु आहे. (हेही वाचा- नशेत धूत असलेल्या तरुणीला घेऊन जाताना तरुण धापकन पडला (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रा येथे भरधाव ऑटोरिक्षाने समोरून येणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातानंतर रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पाहा व्हिडिओ 

अपघातानंतर स्थानिकांनी  जखमींना मदत करण्यासाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. अपघाताची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघात प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.