Gautami Patil Viral Video Case: गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक, पुणे पोलिसांची कारवाई
आता पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंद केला आहे. 24 फेब्रुवारीला कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने गौतमी पाटीलचा अर्धनग्न व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil). गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होतच असतो. पण गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान गौतमी कपडे बदलत असताना ते शूट करुन त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता.
आता पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंद केला आहे. 24 फेब्रुवारीला कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने गौतमी पाटीलचा अर्धनग्न व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर गौतमी पाटीलच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गौतमी पाटील सोबत डान्स करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हेही वाचा Free Auto Service: आळंदी येथे ‘The Kerala Story' पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना मिळणार मोफत ऑटो सेवा; रिक्षा चालकाचा फोटो व्हायरल
आता याप्रकरणी एक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंदवण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं होतं.
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2023 11:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

