Pune: पुण्यातील घटना! मुलीला जन्म दिला म्हणून बायकोची हत्या, नवऱ्याला अटक

मुलीला जन्म दिला म्हणून एका व्यक्तीने बायकोची हत्या (Man Kills Wife) केल्याची माहिती समोर आली आहे.

Representational Image (Photo Credits: Facebook)

स्त्री -पुरुष समानतेच्या दिशेने वाटचाल सुरु असताना पुण्यातील (Pune) पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwd) मावळ (Maval) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला जन्म दिला म्हणून एका व्यक्तीने बायकोची हत्या (Man Kills Wife) केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली आहे. या घटनेनंतर चांदखेड गावात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी दाभोडी पोलीस अधिक तपास करीत आहे.

योगेश कैलास जाधव (वय, 26) असे आरोपीचे नाव आहे. योगेशने 2018 मध्ये चांगुणा (वय, 20) हिच्याशी लग्न केले होते. दरम्यान, चांगुणाने गेल्या सहा महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. मुलगी जन्मली म्हणून योगेश चांगुणाचा नेहमीच छळ करत होता. हे सुरु असताना शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी चांगुणा टी.व्ही बंद करायची विसरली. याच रागातून योगेशने चांगूणाचा गळा आवळून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच दोभोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून आरोपी योगेशला बेड्या ठोकल्या आहेत. हे देखील वाचा- Nagpur: विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फेसबूक फ्रेन्डविरोधात गुन्हा दाखल, नागपूर येथील घटना

याप्रकरणी आरोपीविरोधात कलम 302, 498 (अ) , 323 , 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडिलकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मृत महिलेचे नातेवाईकांकडून केली जात आहे.