IPL Auction 2025 Live

महाराष्ट्र: ठाण्यात एका ड्रग्ज पेडलरला 100 किलो गांजासह अटक

अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरला त्याच्या साथीदारांची आणि मुंबईत हे जाळे आणखी कुठपर्यंत पसरले आहे याची पोलिस माहिती घेत आहे

Ganja Seized (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

ठाण्यामध्ये पोलिसांनी (Thane Police) एक मोठी कारवाई केली आहे. ठाण्यात एका ड्रग्ज पेडलरला (Drugs Peddler) 100 किलो गांजासह (Ganja) अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्ता कराळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, अटक केलेल्या ड्रग्ज पेडलरचे नाव विजयकुमार सूर्यमन पटेल असे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलिसांनी सापळा रचून या ड्रग्ज पेडलरला अटक केली. त्याच्याकडून 100 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरला त्याच्या साथीदारांची आणि मुंबईत हे जाळे आणखी कुठपर्यंत पसरले आहे याची पोलिस माहिती घेत आहे.हेदेखील वाचा- मुंबई मध्ये NCB ची मोठी कारवाई; डोंगरी भागात Chinku Pathan च्या ड्रग कारखान्यावर छापा

दरम्यान काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील डोंग़री भागातील ड्रग्सच्या कारखान्यावर छापा टाकल्यानंतर 1 फेब्रुवारीच्या रात्री माहिम परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात MD (Mephedrone)चा साठा आढळला आहे. कमर्शिअल क्वान्टीटी मध्ये हे ड्रग्स आढळल्याने एनसीबीने ते ताब्यात घेत पुढील तपास सुरू ठेवला आहे. या ठिकाणी एनसीबीने 3 जणांना अटक देखील केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर मुंबई मधील अनेक ड्रग्स तस्कर सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं देखील यावेळेस चर्चेमध्ये आली होती. त्यापैकी काहींना एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी देखील बोलावण्यात आले होते.