Pune-Dighi Highway Accident: पुणे-दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात वऱ्हाडाची बस उलटली; 5 ठार, 25 हून अधिक जखमी

तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Pune-Dighi Highway Accident (फोटो सौजन्य - X/@timesofindia)

Pune-Dighi Highway Accident: पुणे-दिघी महामार्गावरील ताम्हिणी घाटातील (Tamhini Ghat) कोंडेथर गावात (Kondethar Village) लग्नातील पाहुण्यांना घेऊन जाणारी खासगी बस (Private Bus) आज सकाळी 10 च्या सुमारास उलटली. लग्नासाठी पुण्याहून बिरवाडीकडे निघालेली बस माणगावकडे जात असताना ही घटना घडली. पलटी होण्यापूर्वी बसचे नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. ताम्हिणी घाटात तीव्र वळण घेत बस रस्त्याच्या कडेला उलटली.

अपघातात पाच जणांचा मृत्यू -

या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे आहेत. (हेही वाचा -Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! बोटिंगचे नियम बदलले; पर्यटकांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन)

बारामती-भिगवण रोडवर झालेल्या अपघातात 2 ट्रेनी पायलट ठार -

दरम्यान, बारामती भिगवण रोडवर पुण्यातील जैनीकवाडी गावाजवळ 9 डिसेंबरच्या पहाटे झालेल्या अपघातात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिक ठार झाले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होते. बारामती भिगवण रोडवर जैनीकवाडी गावाजवळ पहाटे 3 वाजताच्या सुमारास टाटा हॅरियर एसयूव्ही BR-03AM-9993 क्रमांकाची नोंदणी क्रमांकाची गाडी रस्त्यावर उलटल्याने कारचा अपघात झाला. या घटनेत रेड बर्ड कॉलेजमधील दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांना जीव गमवावा लागला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif