मुंबई: मांटुगा किंग्स सर्कल जवळ BEST Bus ने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी नाही

बसला लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

BEST bus caught fire at King's Circle in Matunga, Mumbai (Photo Credits: ANI)

मुंबईतील (Mumbai) मांटुगा (Matunga) येथील किंग्स सर्कल (King's Circle) येथे बेस्ट बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. बसला लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे.

वरळी बस आगाराची 27 क्रमांकाची ही बस होती. ही बस मुलुंड वैशाली नगर ते वरळी मार्गादरम्यान धावते. आज (31 जुलै) दुपारी 4.30 च्या दरम्यान मुलुंडहून वरळीकडे जात असताना माहेश्वरी उद्यानाजवळ या बसला आग लागली. (Mumbai Fire: माझगाव डॉक येथील रिकाम्या जहाजाला आग; एका व्यक्तीचा मृत्यू)

ANI ट्विट:

पहा व्हिडिओ:

बस मधून धूर येऊ लागल्याने प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. बसला लागलेली आग अधिकच भडकली आणि केबिन जळून खाक झाले. आगीचे लोट, प्रचंड धूर यामुळे रस्त्यावरील वाहतूकही काही काळ थांबवण्यात आली होती. (Mumbai Fire: गोरेगाव परिसरात उभ्या BEST च्या बसने घेतला पेट, प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह)

काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील MTNL च्या इमारतीला आग लागली होती. या आगीत सुमारे 100 लोक अडकले होते. मात्र त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.