Palghar: देवदर्शनाला गेला पण काळाने घाला घातला! पालघरमधील जीवदानी मंदिरात जाताना हृदयविकाराच्या झटक्याने 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Palghar: पालघर जिल्ह्यातील विरार भागात उंचावर असलेल्या जीवदानी मंदिरात (Jivdani Temple) जात असताना एका 41 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजता घडली. देविदास माही, असं मृत व्यक्तीचं नाव असून ते मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आहेत.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिरात जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आणखी एका घटनेत लातूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका फुगा विक्रेत्याचा मृत्यू झाला आणि 11 मुले जखमी झाली. (हेही वाचा - Nandurbar Accident: धुळे- सुरत मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू)

रविवारी सायंकाळी इस्लामपुरा-तावरजा परिसरात ही घटना घडली असून रामा नामदेव इंगळे (50) असे मृताचे नाव आहेत. ते बीडमधील अंबाजोगाई येथील रहिवासी होते. इंगळे यांच्या आजूबाजूला मुलं उभी असताना फुग्यात ज्या सिलिंडरमधून गॅस भरला जात होता त्याचा स्फोट झाला. यात अकरा मुले जखमी झाली. त्यापैकी दोघांना उपचारांसाठी सोमवारी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

परिसरातील रहिवाशांनी जखमी मुलांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (GMCH) दाखल केले. जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली, तर आमदार अमित देशमुख आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुलांना उपचाराचा भाग म्हणून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.



संबंधित बातम्या