Nandurbar Accident: धुळे- सुरत मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
या दुर्देवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक सरपणी नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली.
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात (Nandurbar Accident News) झाला. नंदूरबारमधील नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी आहे. दुचाकीवर एकूण तीन जण एकत्र प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की दुचाकीवरील एक युवक ट्रकच्या मागच्या चाकात अडकल्याने आठ ते दहा फूट फरफटत गेला. (हेही वाचा - Bridge Collapsed In Chiplun: चिपळूणमध्ये भीषण अपघात, बांधकामाधीन पूल कोसळला; घटना कॅमेऱ्यात कैद, Watch Video)
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार जिल्ह्यातील धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटरसायकलीची समोरासमोर धडक झाली. या दुर्देवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक सरपणी नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर जखमी तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली असून घटनेची माहिती मिळताच तात्काळ विसरवाडी पोलीस दाखल झाले. दुर्देवी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2023 07:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

