मुंबई: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन महिलांना अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी 27 वर्षीय व्यक्तीला अटक
यासंदर्भात टिळक नगर पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, "पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपी बिट्टू पलसिंग प्राचा गाडीत बसला होता. त्यानंतर त्याने या दोन महिलांना आपले प्रायव्हेट पार्ट्स दाखवले. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर या महिलांनी टिळक नगर पोलिस ठाण्यात येऊन यासंदर्भात तक्रार दिली.”
मुंबईतील विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ दोन महिलांना अश्लिल हावभाव केल्याच्या आरोपाखाली एका 27 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात टिळक नगर पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, "पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपी बिट्टू पलसिंग प्राचा गाडीत बसला होता. त्यानंतर त्याने या दोन महिलांना आपले प्रायव्हेट पार्ट्स दाखवले. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर या महिलांनी टिळक नगर पोलिस ठाण्यात येऊन यासंदर्भात तक्रार दिली.”
टिळक नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांनी आरोपीच्या वाहनाचा नंबर नोंदविला होता. या नंबरच्या सहाय्याने आरोपीला नटराज बारजवळ अटक करण्यात आली आहे. इन्स्पेक्टर लता सुतार यांनी सांगितले की, आरोपी हा सफाई कामगार असून जेव्हा त्याने महिलांसोबत अश्लिल हावभाव केले तेव्हा तो त्याच्या मित्राची गाडी चालवत होता. (हेही वाचा - Acid Attack: क्षुल्लक वादातून एका व्यक्तीने पाच जणांवर फेकले अॅसिड; भिवंडी येथील धक्कादायक घटना)
दरम्यान, या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (A) (लैंगिक छळ), 509 (शब्द, हावभाव किंवा एखाद्या स्त्रीच्या विनम्रतेचा अपमान करण्याचा हेतू ) आणि 336 (इतरांचे जीवन धोक्यात आणणारे किंवा वैयक्तिक सुरक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाचं शहरात विविध ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईमध्ये मागील 9 दिवसांत 19 हजार 906 रुग्णांची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यांमध्ये रिकव्हरी रेट 2 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना संक्रमण कमी होताना दिसत आहे.