Coronavirus In Mumbai: मुंबईत आज आणखी 991 नव्या रुग्णांची नोंद; 34 जणांचा मृत्यू

मुंबईत (Mumbai) आज आणखी 991 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 34 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 36 हजार 348 वर पोहचली आहे. यापैंकी 7 हजार 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) आज आणखी 991 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 34 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 36 हजार 348 वर पोहचली आहे. यापैंकी 7 हजार 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: 'गाफील राहू नका', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नागरिकांना इशारा; कोरोना व्हायरस लसीवरही केले भाष्य

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. तसेच येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाउन उघडणार की आणखी वाढवला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement