Coronavirus: पुण्यात आज 99 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2202 वर पोहोचली
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2202 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 553 कोरोना रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात पुण्याचे आयुक्त दिपक म्हैसकर (Deepak Mhaisekar) यांनी माहिती दिली आहे.
Coronavirus: पुण्यात (Pune) आज 99 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2202 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 553 कोरोना रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात पुण्याचे आयुक्त दिपक म्हैसकर (Deepak Mhaisekar) यांनी माहिती दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे आरोग्य विभागाने माहितीनुसार आज पुण्यात 3 नव्या कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात 11 वर्षीय मुलाचा समावेश आहे. (हेही वाचा - Coronavirus: भारतामध्ये कोरोना रुग्णाची 46,711 वर पोहोचली; 5 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
दरम्यान, भारतात सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजार पेक्षा जास्त झाली आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णाची 46,711 वर पोहोचली आहे. यातील 31,967 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 1,583 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.