Ahmedanagar Gangrape: अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपींनी मुलीचा अश्लिल व्हिडिओ काढत तो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. हे प्रकरण गेल्या एक महिन्यांपासून चालून असल्याचे समोर आले आहे. हेही वाचा- अमरोहामध्ये भटक्या कुत्र्यांचा मुलीवर हल्ला; स्थानिकांनी वाचवला मुलीचा जीव
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा या गावातील घटनेमुळे नागरिकांना धक्काच बसला आहे. दरम्यान, मुलीचा अश्लिल व्हिडिओ नातेवाईकांनी पाहिला त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला गेला. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केले आहे. त्यांच्यावर पोस्को कायद्यांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ वर्षाच्या मुलीवर धमकी देत सामुहिक बलात्कार आला. या घटनेचा त्यांनी व्हिडिओ देखील बनवला होता आणि तीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
महिन्याभरानंतर पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी आरोपी संतोष रामभाऊ पवार आणि युवरा नंदू शेंडगे असं आरोपीचे नावे आहे. त्यांच्यावर पोक्सो अॅट्रॉसिटीसह सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर केले असून १४ मार्चपर्यंत कोठवडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांंनी गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.