IPL Auction 2025 Live

रत्नागिरी: खेड-दिवाणखवटी दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनला अपघात; रुळावरून डबे घसरल्याने मोठं नुकसान

रुळावरून डबे घसरल्याने मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. राज्यात सध्या प्रवासी रेल्वे गाड्या बंद आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करण्यासाठी विशेष मालवाहतूक गाड्या सुरु आहेत.

Ratnagiri Train Accident (PC _ANI)

रत्नागिरी (Ratnagiri) मधील खेड-दिवाणखवटी दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनला (Train) अपघात (Accident) झाला आहे. रुळावरून डबे घसरल्याने मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. राज्यात सध्या प्रवासी रेल्वे गाड्या बंद आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करण्यासाठी विशेष मालवाहतूक गाड्या सुरु आहेत.

कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर मालगाडीला हा अपघात झाला आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पनवेलहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे सात डबे घसरले. हा अपघात दिवाणखवटी ते खेडच्या दरम्यान घडला. या अपघातात रेल्वे रुळ पूर्णतः तुटून गेले. या अपघाताचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही. (हेही वाचा - Lockdown: लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजूरांच्या रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधी मधून भरण्यात येणार)

दरम्यान, दुपारच्या सुमारास मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले. यावेळी डबे घसरल्याच्या आवाजाने आजूबाजूला काम करणारे काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. रेल्वे अपघाताची माहिती मिळताच कोकण रेल्वेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सध्या ट्रेनच्या डब्यांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे. या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्ग पुढील काही तास बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.