Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात एका दिवसात 811 नवे रुग्ण आढळले तर, 22 लोकांचा मत्यू

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले आहेत. महाराष्ट्रात आज 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 811 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येने 7 हजार 628 चा आकडा गाठला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 3 मेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत 24 हजार 942 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 हजार 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 7 हजार 628 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांपैंकी 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- मद्य विक्रीवरून महाराष्ट्राचे राजकारण पेटले; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भुमिकेला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोध

एएनआयचे ट्वीट-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement