Maharashtra Monsoon Forecast: मराठवाडा, विदर्भ आणि घाट परिसरात पुढील 3-4 तास विजांंच्या कडकडाटात पावसाची शक्यता- IMD

होसाळीकर (K. S. Hosalikar) यांंनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तास दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada) , विदर्भ (Vidarbha) आणि घाट प्रदेशात विजांंच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Monsoon 2020 | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Maharashtra Monsoon Update: हवामान खात्याचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांंनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तास दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada) , विदर्भ (Vidarbha)  आणि घाट प्रदेशात विजांंच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंंबई (Mumbai) आणि गोवा (Goa)  येथील रडारवरील रेकॉर्ड झालेली दृश्य शेअर करत होसाळीकर यांंनी आजच्या संंध्याकाळसाठीचे पावसाचे अंदाज वर्तवले आहेत. या भागात आता सुद्धा ढगांंचा गडगडाट आणि विजांंचे आवाज ऐकु येत आहेत. दुसरीकडे मुंंबई, पुणे (Pune) , कोकण (Konkan) , ठाणे (Thane) , रायगड (Raigad)  परिसर हे कालपासुन शांंत आहेत, या भागात पावसाने विश्रांंती घेतली असुन काल मुंंबई उपनगरात काही हलक्या सरी बरसल्या होत्या मात्र त्यानंंतर आज पुन्हा उजाडले आहे. Nashik Earthquake: नाशिकला सकाळपासून दुसरा भूकंपाचा धक्का; 2.5 रिश्टल स्केलने हादरला परिसर

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 6 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वाढण्याची शक्यता होती. तर मुंबईत कोरडे वातावरण अनुभवायला मिळेल असे सांंगण्यात आले होते. हे अंदाज खरे ठरत आहेत व पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहण्याची सुद्धा शक्यता आहे.

K . S . Hosalikar ट्विट

दरम्यान, राज्यातील बदलत्या वातावरणामुळे तब्येतीची काळजी घेण्याची खास गरज आहे. अगोदरच कोरोनाचे सावट असताना स्वास्थ्य टिकवुन ठेवण्यासाठी पाणी उकळुन पिणे, जेवणात संयम ठेवणे तसेच कोरोना संबंधित नियम म्हणजे हात धुणे, सर्दी खोकला असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे याचे पालन करावे.