अलंकापुरीत रंगला माऊलींचा 723 वा संजीवन समाधी दिन सोहळा

हरिनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, हजारो वारकऱ्यांच्या सानिध्यात मोठ्या थाटामाटात माऊलींचा 723 वा संजीवन समाधी दिन सोहळा आळंदी येथे रंगला आहे

आळंदी (Photo credit : Youtube)

हरिनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, हजारो वारकऱ्यांच्या सानिध्यात मोठ्या थाटामाटात माऊलींचा 723 वा संजीवन समाधी दिन सोहळा आळंदी येथे रंगला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर अभिषेक करण्यात आला. यानिमित्त इंद्रायणी नदीच्या तीरावरील असंख्य वारकऱ्यांनी गुलाल, बुक्का आणि फुलांची ओंजळ वाहून माउलींना भावपूर्ण नमन केले. आळंदी लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे कार्तिकी दिवशी हा सोहळा भक्तांसाठी महत्वाचा असतो.

काल (मंगळवार) द्वादशीनिमित्त लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत कार्तिकीवारी सोहळ्यातील रथोत्सवाचा कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. माऊलींचा चांदीचा मुखवटा रथामध्ये ठेवून त्याची परंपरेप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली. ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’ अशा गजरात वारकऱ्यांनी माउलींचा रथ ओढून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या 723 व्या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदीत भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आळंदीत आले आहेत.

यानिमित्त सकाळी दहा ते बारा या वेळेत संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांचे देऊळवाड्यात कीर्तन पार पडले. त्यानंतर घंटानाद, पुष्पवृष्टी वर्षाव, आरती  आणि महाप्रसादअसा कार्यक्रम असणार आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री पांडुरंगाच्या पादुका यावर्षीही आळंदी कार्तिकी वारीसाठी हरिनाम गजरात आल्या आहेत. इंद्रायणी तीरावरील मल्लाप्पा वासकर महाराज यांच्या फडावर या पादुकांच्या दर्शनासाठी ठेवल्या आहेत.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

अलंकापुरीत रंगला माऊलींचा 723 वा संजीवन समाधी दिन सोहळा

Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश

Advertisement

Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज

Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement