Accident On Ghatkopar-Mankhurd Link Road: घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर टेम्पो ट्रेलरच्या धडकेत 72 वर्षीय महिलेचा मृत्यू; पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

मंगलमूर्ती जंक्शन हे अपघाताचे ठिकाण आहे. विजयने पोलिसांकडे चौकशी केली असता, पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिला एका टेम्पो ट्रेलरने धडक दिली. तिला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

Accident On Ghatkopar-Mankhurd Link Road: घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर (Ghatkopar-Mankhurd Link Road, GMLR) टेम्पोच्या ट्रेलरने धडक दिल्याने एका 72 वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. हा अपघात (Accident) झाला तेव्हा महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. मानखुर्द येथील पीडित बेबी आनंदा चौधरी (Baby Ananda Chowdhury) या सकाळी काही कामांसाठी घरातून निघाल्या होत्या. त्यांचा नातू, विजय मोरे याला स्थानिक दुकान मालकाचा फोन आला. ज्याने त्याला अपघाताची माहिती दिली.

मंगलमूर्ती जंक्शन हे अपघाताचे ठिकाण आहे. विजयने पोलिसांकडे चौकशी केली असता, पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिला एका टेम्पो ट्रेलरने धडक दिली. तिला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (हेही वाचा -Mumbai Pune Express Way: तब्बल 35 तासानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटली)

टेम्पोचा चालक अविनाश यादव याने पीडितेला मदत केली. पोलिसांनी चालकाला अटक केली. BIGRS भागीदार, BMC आणि वाहतूक पोलिस यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या अहवालानुसार, 2022 मध्ये, 161 पादचाऱ्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला, तर 2020 मध्ये 148 जणांचा मृत्यू झाला. GMLR साठी कोणताही स्वतंत्र डेटा नसला तरीही विशेषतः पादचाऱ्यांसाठी हा सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक मानला जातो. (हेही वाचा - Amaravati Road Accident: आमदार बळवंत वानखेडे यांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू)

दरम्यान, GMLR च्या दोन्ही बाजू एकतर बांधकाम साइट्स, झोपडपट्ट्या किंवा स्थानिक दुकानांनी भरलेल्या आहेत. नो क्रॉसिंगचे फलक असूनही, लोक वेळ वाचवण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत रस्ता ओलांडतात. येथे वाहने भरधाव वेगाने जातात. पादचाऱ्यांना वाटते की ते पलीकडे पोहोचू शकतात. परंतु, याठिकाणी वेगवान वाहने ताशी 40 ते 50 किलोमीटरने जातात. त्यामुळे अचानक वाहन थांबवण्यात चालकांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघात होतात, असं वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

तथापी, अहवालात असेही नमूद केले आहे की, सर्वात असुरक्षित रस्ते वापरकर्ते हे पादचारी, सायकलस्वार, मोटरसायकलस्वार आणि तीनचाकी वाहने आहेत. या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे पादचारी व्यक्तींचे झाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now