IPL Auction 2025 Live

Mumbai Rains Update: मुंबईत पावसाचा जोर ओसरणार; आज शहरात मध्यम स्वरुपातील सरी बरसणार- IMD

हवामान खात्याच्या माहितीनुसार (IMD) , आज मुंंबईत कमी ते मध्यम स्वरुपातील पाउस असेल.

Mumbai Rains | (Photo Credits: ANI)

Mumbai Rains Today: मागील काही दिवसांपासुन मुंंबई सह उपनगरात सुरु असलेल्या पावसाचा जोर आज कमी होणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार (IMD) , आज मुंंबईत कमी ते मध्यम स्वरुपातील पाउस असेल. यानुसार हवामान खात्याने मुंंबई व ठाणे जिल्ह्याकरिता पिवळा अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. शुक्रवार सकाळ पासुन पाउस कमी झाल्याने मुंंबईत ठिकठिकाणी साचलेले पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे, परिणामी आज तरी रेल्वे, बस च्या वाहतुकीस अडथळा येणार नाही असा अंदाज आहे. तरीही, शहरात एनडीआरएफचे पथक सतर्क ठेवण्यात आले आहे. Mumbai Rains: पावसामुळे कांदिवलीच्या पश्चिम एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळल्याची घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा Video

प्राप्त माहिती नुसार, बुधवारी दक्षिण मुंबईतील कुलाबा हवामान वेधशाळेत गेल्या 22 वर्षात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक एक दिवस पाऊस पडल्याचे सांगितले. मुंबई आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्य प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला होता. (Monsoon Updates 2020: गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकसह उपविभागातील किनार पट्टीला पुराचा धोका)

दुसरीकडे केवळ मुंंबईच नव्हे तर रायगड सहित कोकण पट्ट्यात सुद्धा काही दिवस पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे, सावित्री नदी तसेच कोल्हापुर मधील पंचगंगा नदीने या काळात धोक्याची पातळी ओलांडली होती. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाउस सुरु आहे.

दरम्यान या सर्व परिस्थितीत मुंंबईकरांसाठी फायद्याची माहिती अशी की, विहार आणि तुळशी हे मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात लहान दोन तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहायला लागले आहेत. तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी आणि वैतरणा या तलावक्षेत्रात उत्तम पाऊस झाल्याने पाणी कपातीचं संकट टळण्याची शक्यता आहे.