Ganpati Festival Special Trains 2019: गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी 6 नवीन विशेष रेल्वे, असे असेल या रेल्वेचे वेळापत्रक

कोकणात जाणा-या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून या रेल्वेप्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि सर्व चाकरमान्यांना कोकणात जाता यावे यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने (Konkan Railway) 6 नवीन विशेष रेल्वे सेवा सुरु केली आहे.

Tutari express (Photo credits: Instagram)

Konkan Railway:  गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात जाणारा चाकरमानी जोरदार तयारीला लागला असून कोकणात जाण्यासाठी जणू आसुसलेलाच असतो असे म्हणायला हरकत नाही. या सणासाठी कोकणात जाणा-या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून या रेल्वेप्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि सर्व चाकरमान्यांना कोकणात जाता यावे यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने (Konkan Railway) 6 नवीन विशेष रेल्वे सेवा सुरु केली आहे.

या नवीन रेल्वेना ब-याच महत्त्वाच्या स्थानकांत थांबा मिळणार असल्यामुळे चाकरमानीही सुखावलाय. पाहूयात कोणत्या आहेत या रेल्वेसेवा आणि त्यांचे वेळापत्रक:

1. पुणे-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस (2 फे-या)

वेळ-29 ऑगस्टला ही रेल्वे रात्री 12.10 मिनिटांनी पुण्याहून सुटणार असून सकाळी 4 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहचेल. तर परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोड स्थानकातून सकाळी 5.20 मिनिटांनी सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुपारी 4.50 मिनिटांनी पोहचेल.

2. लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-पनवेल (2 फे-या)

वेळ-30 ऑगस्टला ही रेल्वे संध्याकाळी 5.50 मिनिटांनी सुटून सकाळी 6.30 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. तर सावंतवाडी स्थानकातून सकाळी 10.55 मिनिटांनी सुटून पनवेलला रात्री 11.40 मिनिटांनी पोहोचेल.

हेही वाचा- Ganpati Festival Special Trains 2019: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या एसी डबल डेकरसह तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येतही वाढ

3. पनवेल-सावंतवाडी रोड-पुणे (2 फे-या)

वेळ- 31 ऑगस्टला ही रेल्वे पनवेलहून मध्यरात्री 12.55 मिनिटांनी सुटणार असून दुपारी 2.10 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. तर हीच रेल्वे सावंतवाडी रोड स्थानकातून दुपारी 3.20 मिनिटांनी सुटून पुणे स्थानकात सकाळी 7.25 मिनिटांनी पोहोचेल.

या सोबतच दादर-मनमाड-दादर जनशताब्दी एक्सप्रेसला (Janshatabdi Express) सावंतवाडी रेल्वेस्थानकात थांबा देण्याचेही रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 30 ऑगस्टपासून हे सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर तुतारी एक्सप्रेसच्या (Tutari Express) वेळतही बदल करण्यात आला असून नवीन वेळापत्रकानुसार दादर येथू रात्री 12.10 ही रेल्वे सुटणार असून दुपारी 12.25 ला ही रेल्वे सावंतवाडी स्थानकात पोहोचेल. हा बदल 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.