Maharashtra Monsoon 2019 Live Updates: राधानगरीत अडकले गोव्याचे 150 प्रवासी, बचावकार्याला सुरुवात

मुंबई, ठाणे सह कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्याने दरड कोसळण्याचं, रस्स्ते खचण्याचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी रस्स्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

06 Aug, 23:53 (IST)

-पुणे येथून कोल्हापूर मार्गाने गोव्यात येणाऱ्या बारा बस आणि गोव्याचे सुमारे 150 प्रवासी राधानगरी येथे अडकले आहेत. 
-राधानगरीमधील पुराच्या पाण्यामुळे हे सर्व प्रवासी अडकल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. 
-पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

06 Aug, 22:12 (IST)

 मुंबईसह कोकणामध्ये जोरदार पाऊस आजही कायम आहे. त्यामुळे दुथडी भरून वाहणार्‍या नद्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

06 Aug, 21:33 (IST)

 कोल्हापूरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. महापूराची  स्थिती असलेल्या कोल्हापूरात आज दूध संकलन थांबवण्यात आलं आहे.

06 Aug, 19:57 (IST)

 

NDRF च्या पथकात सांगली शहरातून 300 तर कोल्हापूरातील खुंटवाड, आंबेवाडी, चिखली या भागातून 475 लोकांची पूराच्या पाण्यातून सुटका केली आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. 

06 Aug, 19:08 (IST)

 कोल्हापूरात कोसळत असणार्‍या विक्रमी पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यास सुरूवात झाली आहे. महावितरणच्या दुधाळी उपकेंद्रात पुराचे पाणी घुसले असून तीस हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला आहे. 

06 Aug, 18:14 (IST)

 पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर होत आहे. मुंबई पुण्यादरम्यान धावणार्‍या डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस,सिंहगड एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द   

06 Aug, 18:04 (IST)

 कोल्हापूर शहरात मागील काही तासांपासून सतत कोसळणार्‍या पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामध्ये ऐतिहासिक राजमार्गावर दरड कोसळली असून गावातील अनेक महत्त्वाचे रस्स्ते बंद झाले आहेत. महाबळेश्वर जवळचा रस्स्ता देखील बंद झाला आहे. 

06 Aug, 17:06 (IST)

सांगली, कोल्हापूर शहरातील पूर सदृश्य परिस्थितीमध्ये Air Force helicopters च्या मदतीने बचावकार्य केले जाणार आहे. सध्या NDRF ची टीम रवाना झाली असून 1500 कुटुंबांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं आहे.

06 Aug, 15:46 (IST)

पुण्यामध्ये पुढे काही तास मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पूराचे पाणी रस्स्त्यावर आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूकीसाठी  6 पूल बंद करण्यात आले आहेत. 

06 Aug, 15:42 (IST)

 

नाशिक शहराला मागील कही महिन्यापासून मुसधार पाऊस कोसळत आहेत. या जोरदार पावसात 6 वाडे कोसळले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  

06 Aug, 14:53 (IST)

कोल्हापूर, सांगली भागात पावसाची जोरदार बरसात सुरू असल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्यांसाठी स्थानिक प्रशासनासोबत NDRF चे जवान देखील नागरिकांना मदत करत आहेत. सध्या सुमारे 30 जणांची सुटका करण्यात त्यांना यश आलं आहे.

06 Aug, 14:49 (IST)

कोल्हापूरात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचायला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर कडून कर्नाटकाकडे जाणारी वाहतूक देखील यामुळे विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

06 Aug, 14:39 (IST)

 राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले असून या धरणातील वीज निर्मिती प्रकल्प बंद करण्यात आला आहे. वीजेचे खांब देखील कोसळल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. 

 


Mumbai Rain, Rail Road Traffic Updates: मुंबई, ठाणे, पालघर भागात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापसून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज (6 ऑगस्ट) तळकोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये सक्रिय असलेल्या मान्सून मुळे सध्या मध्य महाराष्ट्र वगळता इतर सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्स्ते, रेल्वे वाहतूक देखील कोलमडली असल्याचं चित्र आहे. Maharashtra Monsoon 2019 Forecast: दक्षिण कोकणात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार; हवामान खात्याचा अंदाज

मुंबईमध्ये लोकल रेल्वे सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडल्याचं चित्र असल्याने सामान्यांना मोठा फटका बसला आहे. मुंबई, कोकण, नाशिक या भागामध्ये धरणं, नद्या यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी किनारी राहणार्‍या अनेक गावांना सुरक्षेच्या कारणास्तव इतरत्र हलवण्यात आले आहे.

मुंबईमध्ये लोकल ट्रेन्सचं वेळापत्रक कोलमडलं आहे. डोंबिवली, टिटवाळा येथून सुटणार्‍या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. पुणे, सिंधुदुर्ग भागामध्ये जोरदार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now