Scholarship Exam Results 2019: आज दुपारी 3 वाजता www.mscepune.in वर जाहीर होणार 5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 2019चे निकाल आज (16 मे) दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

5th & 8th Std Scholarship Results 2019:  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (Maharashtra State Council Of Examinations) कडून फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 2019चे निकाल आज (16 मे) दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल www.mscepune.in आणि http://puppss.mscescholershipexam.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. 5 वी आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षा 2019 चा अंतरिम  निकाल जाहीर; puppss.mscescholarshipexam.in वर कसा पहायचा रिझल्ट

कसा पहाल शिष्यवृत्ती निकाल 2019

शिष्यवृत्ती परीक्षा 2019 चे अंतिम उत्तरसूची यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. यंदा पाचवीच्या परीक्षेत 13 आणि आठवीच्या परीक्षेत 13 असे एकूण 26 प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे हे प्रश्न वगळून यंदा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवण्यात येणार आहे. महाराष्ट्र: 5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 26 चुकीचे प्रश्न वगळून लावणार निकाल! उत्तरसूची www.mscepune.in वर प्रसिद्ध

24 फेब्रुवारीला पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली. या परीक्षेला पाचवीसाठी 5,12,667 आणि आठवीसाठी 3,53,317 विद्यार्थी बसले होते.