मुंबई: पाच वर्षांच्या चिमुकलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाला 5 वर्षाची शिक्षा
ही घटना 2017 साली घडली असून यावर आता मुंबई (Mumbai) विशेष न्यायालयाने या खटल्याची शिक्षा सुनावली आहे.
पाच वर्षाच्या चिमकुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका स्कूल व्हन चालकाला 5 वर्षाची शिक्षा झाली आहे. ही घटना 2017 साली घडली असून यावर आता मुंबई (Mumbai) विशेष न्यायालयाने या खटल्याची शिक्षा सुनावली आहे. शबीब अहमद गुलाम असे आरोपीचे नाव असून पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. भारतीय दंड संहिता कायद्यानुसार, आरोपीला कलम 506 अंतर्गत 5 वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आला. आरोपी हा पीडिताच्या शाळेतील स्कूल व्हॅन चालक होता. गेल्या तीन वर्षापूर्वी आरोपी हा संबंधित पीडित मुलीचा लैंगिक छळ करायचा. तसेच ही गोष्ट कोणाला सांगू नको, अशीही धमकी देत असे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून आपली मुलगी नैराश्यात असल्याचे तिच्या पीडिताच्या आईला समजले. त्यावेळी तिने आपल्या मुलीकडे विचारपूस केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडितच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 मार्च 2017 ही संतापजनक घटना घडली. सुनवणी दरम्यान पीडित मुलीने मुंबई विशेष न्यायालयाला सांगितले की, आरोपी कशाप्रकारे तिच्या खाजगी ठिकाणी हात लावायचा. तसेच ही गोष्ट कोणालाही सांगितली तर, त्याचे परिणाम वाईट होतील अशीही धमकी द्यायचा. तसेच आरोपी पीडिताला आंटी म्हणून हाक मारायचा. यावरूनही पीडितच्या आईने आरोपीला खडेबोल सुनावले आहे. पीडित घरी पोहचल्यानंतर व्हॅन चालक तुला काही म्हणाला का? आईने मुलीला विचारले. त्यावेळी पीडित मुलीने काहाही सांगण्यास नकार दिला. पंरतु, पीडित कपडे बदलत असताना पीडितच्या आईला तिच्या पाठीवर नखांचे निशाण दिसले. यामुळे तिने आपल्या मुलीकडे यासंदर्भात विचारपूस केली. स्कूल व्हॅन चालक गेल्या अनेक महिन्यांपासून आपला लैंगिक छळ करत असल्याचे तिने आपल्या आईला सांगितले. हे देखील वाचा- लासलगाव जळीत कांड: पिडीतेचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू; मुख्य आरोपीची कसून चौकशी सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅन चालक तिला एका जुन्या शाळेमागे नेऊन तिच्या खाजगी भागाला हात लावत असल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात कोणालाही काही सांगितल्यास तुझ्या आई आणि आजीला मारण्याची धमकी दिली होती. पीडिताच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर तिने स्थानिक पोलिसांत व्हॅन चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. आरोपीला अटक केल्यानंतर त्यांने आपला गुन्हा कबूल केला.