Thane: मालकाने 16 महिन्यांचा पगार न दिल्याने 45 वर्षीय कामगाराची आत्महत्या
तो कल्याणजवळील शहाड येथील भंडारपाडा भागात एका लाकूड कारखान्यात काम करत होता. त्याला मालकाने 16 महिन्यांचा पगार दिला नव्हता.
Thane: डोंबिवलीतील (Dombivali) एका 45 वर्षीय कामगाराने शुक्रवारी काम करत असलेल्या लाकूड कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. नियमित काम करूनही त्याच्या मालकाने त्याला 16 महिन्यांचा पगार न दिल्याने त्याने हे कठोर पाऊल उचलले. यापूर्वी पगार मागितल्याने मालकाने कामगारांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
खडकपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले की, कैलास अहिरे हा आयरे गाव परिसरात राहत होता. तो कल्याणजवळील शहाड येथील भंडारपाडा भागात एका लाकूड कारखान्यात काम करत होता. त्याला मालकाने 16 महिन्यांचा पगार दिला नव्हता. त्यामुळे या कामगाराने काही महिन्यांपूर्वी मित्रांकडून कर्ज घेतले होते. (हेही वाचा - Thane: मुरबाडमध्ये 38 वर्षीय डॉक्टरचे अपहरण करून 30 लाखांची खंडणी केल्याप्रकरणी पाच जणांना अटक)
गेल्या 16 महिन्यापासून कामगार कर्जबाजारी झाला होता. पैसे नसल्याने कामगाराने हे टोकाचे पाऊल उचलले. घर कसे चालवायचे असा प्रश्न कैलासला पडला होता. नियमित काम करूनही मालक त्याला पगार देत नव्हता. (हेही वाचा - Pune: जेवणात भाकरी मिळाली नाही म्हणून मद्यधुंद महिलेचा हॉटेलमध्ये राडा, पोलिसांवरही हात उगारला)
कैलाशने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. कैलासचा मुलगा यशवंत अहिरे याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही मालकावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, असं पाटील यांनी सांगितलं.