मुंबई: शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर सामूहिक बलात्कार; मानखुर्द येथील धक्कादायक घटना

वाढदिवस साजरा करण्याचा बहाणाने एका 44 वर्षीय महिलेला घरी बोलावून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील मानखुर्द (Mankhurd) परिसरात 24 जून रोजी घडली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

वाढदिवस साजरा करण्याचा बहाणाने एका 44 वर्षीय महिलेला घरी बोलावून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील मानखुर्द (Mankhurd) परिसरात 24 जून रोजी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. पीडित महिलेला घरी बोलवल्यानंतर आरोपींनी शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आहे, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण मानखुर्द परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत हिंदुस्थान टाईम्सने वृत्त दिले आहे.

मुदस्सीर नबी शेख (30), अब्दुल शेख (34), मुराद शेख (29), हैदल शेख (35), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित महिला ही धारावीतील रहवासी आहे. अब्दुल शेख याने जून रोजी पीडित महिलेस मित्राच्या मुलाचा वाढदिवस आहे, असे खोटे सांगितले होते. तसेच पीडित महिलेला दुसरा आरोपी रहीम शेख याच्या घरी बोलवून घेतले होते. दरम्यान, आरोपींनी पीडित महिलेला शितपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला टॅक्सीतून तिच्या घरी सोडले. परंतु, दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला त्रास जाणवू लागल्याने तिने स्वतःची वैद्यकीय तपासणी केली होती. ज्यात तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पीडित महिलेने 1 जुलै रोजी मानखुर्द पोलीस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर दाखल केल्यानंतर चारही आरोपींना अटक केली आहे. हे देखील वाचा- BMC च्या शताब्दी रुग्णालयात PPE किट न देता तरुणाला स्वतःच्या COVID-19 आईचा मृतदेह उचलण्याची जबरदस्ती; दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

भिवंडीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एका डॉक्टराने एका तरुणीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडली होती. डॉ. रामकुवर यादव, असे या नराधमाचे नाव आहे. रामकुवर याच्यावर भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण भिवंडीत चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement