Maharashtra Monsoon Update: मुंबई, ठाणे, कोकणात पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता, IMD ने जारी केला रेड अलर्ट
होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंंबई (Mumbai), ठाणे (Thane) व उत्तर कोकणात (Konkan) पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभुमीवर या भागांना IMD तर्फे रेड अलर्ट देण्यात आला आहे.
आयएमडीचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंंबई (Mumbai), ठाणे (Thane) व उत्तर कोकणात (Konkan) पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभुमीवर या भागांना IMD तर्फे रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंंबई सह उपनगर व ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासुनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाउस पुढील 48 तास कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.प्राप्त माहितीनुसार, मागील 10 तासात मुंंबईत 230 मिमी पावसाची नोंंद झाली आहे, विविध वेधशाळांनी नोंंदवलेल्या रेकॉर्ड नुसार आज सकाळ पर्यंंत कुलाबा येथे 220, सांताक्रूझ 254, राम मंदिर 152, मीरा रोड 152, महालक्ष्मी 172, विद्याविहार 159 मिमी. ठाणे व एनएम मधील बहुतांश स्थानकांवर 150 mm मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. Mumbai Local Trains: मुसळधार पावसाचा मुंबई लोकल ट्रेनवर मोठा परिणाम
मुंंबईत सुरु असणार्या जोरदार पावसामुळे परेल,हिंंदमाता सारख्या सखल भागांंसहितच आता गोरेगाव, मिरा रोड याठिकाणी सुद्धा अनेक घरात, दुकानात पाणी शिरले आहे.कुर्ला बस स्थानकात तर अर्ध्याहुन अधिक बसस्टॉप्स पाण्याखाली गेले आहेत, कंबरेहुन वर पाणी साचल्याचे सुद्धा दृश्य पाहायला मिळतंय. मुंंबईत पावसामुळे पाणी साचुन झालेल्या परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ पाहा.
K. S. Hosalikar ट्विट
आज मुंंबईच्या समुद्रात 12:47 वाजता 4.51 मीटर उंच लाटा उसळणार आहेत,अशा वेळी नागरिकांंनी घरातुन बाहेर पडु नये अशी सुचना बीएमसीकडुन करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीचा अंदाज पाहता आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये व अन्य आस्थापने आज बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.