COVID19: दिलासादायक! महाराष्ट्रात आज 3661 रुग्णांना डिस्चार्ज; राज्यात एकूण 77,453 जणांची कोरोनावर मात

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.

Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी 3 हजार 661 रुग्णांना घरी सोडण्यात आहे. यामुळे राज्यातील कोरोनामुक्तांची सख्या 77 हजार 453 वर पोहचली आहे. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार 844 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. तसेच राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 52 टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे, असेही ते म्हणाले आहेत.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र पोलिस दलाने 24 तासांत गमावले 3 कोव्हिड योद्धे; एकूण 54 कर्मचार्‍यांची कोरोना विरूद्ध झुंज अपयशी

एएनआयचे ट्विट-

आज सोडण्यात आलेल्या 3 हजार 661 रुग्णांमध्ये मुंबई- 2844 (आतापर्यंत एकूण 54 हजार 581) तर, त्यापाठोपाठ पुणे- 401 (आतापर्यंत एकूण 11 हजार 700), नाशिक- 142 (आतापर्यंत एकूण 3 हजार 794), औरंगाबाद-77 (आतापर्यंत एकूण 2 हजार 639), कोल्हापूर- 32 (आतापर्यंत एकूण 1 हजार 415), लातूर- 68 (आतापर्यंत एकूण 600), अकोला- 68 (आतापर्यंत एकूण 1 हजार 516), नागपूर- 29 (आतापर्यंत एकूण 1 हजार 208) रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत, अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.