Coronavirus Update: महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात आज एकूण 350 रुग्ण कोरोनामुक्त
यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आज राज्यात एकूण 350 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत राज्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या रुग्णांना घरी सोडण्याची पहिलीच वेळ आहे. मुंबई (Mumbai) शहरात 228 तर, पुणे (Pune) शहरात 110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकूण 2 हजार 465 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेही चाचण्या मोठ्याप्रमाणावर होऊन रुग्णांचे निदान वेळेत होत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात 9 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. राज्यात 23 मार्च रोजी पुण्यात पहिला रुग्ण बरा झाला होता. त्यानंतर राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. यातच आज राज्यात 350 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील आतापर्यंत सर्वाधिक संख्या आहे. यात मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील- 165, ठाणे- 3, ठाणे महानगरपालिका- 11, नवी मुंबई महानगरपालिका- 14, कल्याण डोंबिवली महानगरपालिका- 7, वसई-विरार महानगरपालिका- 23, रायगड 3 तर, पनवेल महानगरपालिका येथील 2 असे मुंबई मंडळात एकूण 228 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे महानगरपालिका- 72, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका- 14, सोलापूर महानगरपालिका- 22 तर सातारा येथील 2 असे पुणे मंडळात एकूण 110 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. अमरावती महानगरपालिका- 1, बुलढाणा येथे 1 तर नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: नाशिक शहरात कोरोनामुळे नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू
एएनआयचे ट्वीट-
राज्यात सध्या एकूण प्रयोगशाळा असून त्यापैकी 25 शासकीय आणि 20 खासगी प्रयोगशळा आहेत. दररोज त्यांच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त चाचण्यांची क्षमता आहे. कालपर्यंत राज्यात पावणे 2 लाख नमुन्यांपैकी 1 लाख 62 हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.