Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत

प्राप्त माहितीनुसार, सिंदेवाही रेंज फॉरेस्टच्या कंपार्टमेंट क्रमांक 1355 मध्ये सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास वाघाने तीन महिलांवर हल्ला केला. यावेळी पीडित महिला तेंदूपत्ता गोळा करत होत्या.

Tiger | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. शनिवारी सकाळी एकाच ठिकाणी आणि वेळी वाघाने तीन महिलांवर हल्ला (Tiger Attack) करून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, सिंदेवाही रेंज फॉरेस्टच्या कंपार्टमेंट क्रमांक 1355 मध्ये सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास वाघाने तीन महिलांवर हल्ला केला. यावेळी पीडित महिला तेंदूपत्ता गोळा करत होत्या.

मृतांची ओळख पटली आहे. वाघाच्या या हल्ल्यात कांताबाई चौधरी (60), त्यांची सून शुभांगी चौधरी (38) आणि सारिका शेंडे (48) यांचा मृत्यू झाला आहे. या सर्व महिला मेंढा माल (Mendha Mal village) गावातील रहिवासी आहेत. वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वाघाने तिन्ही महिलांवर हल्ला करून त्यांना जागीच ठार मारले. त्यांचे मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. (हेही वाचा -Up Tiger Attack Video: शौचास बसलेल्या तरुणावर वाघाचा खतरनाक हल्ला, गावकऱ्यांमध्ये घबराट, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल)

वाघाच्या हल्ल्यात एकाचवेळी तीन महिलांच्या मृत्यूमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. एकाच वेळी असे हल्ले होणे अत्यंत दुर्मिळ आहे. तथापि, वन कर्मचाऱ्यांनी या परिसरात दक्षता वाढवली.(हेही वाचा - Woman Dies in Tiger Attack: वायनाडमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; कॉफी बीन्स तोडणारी महिला ठार)

याशिवाय, याच भागातील आणखी एक महिला वंदना गजभिये (50) यांच्यावर देखील वाघाने हल्ला केला होता. या हल्ल्यात वंदना यांना गंभीर दुखापत झाली होती. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तथापि, वन अधिकारी हाय अलर्टवर असून संबंधित वाघाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना एकट्याने जंगली भागात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement