बीड: परळीत खदानीतील पाण्यात बुडून 3 बहीण भावंडांचा मृत्यू

हे तीन भावडं शहराजवळ खाणीत कपडे धुण्यासाठी गेले होते. मृत पावलेल्यांमध्ये दोन मुलींचा आणि एका मुलाचा समावेश आहे. ही घटना परळी तालुक्यातील दाऊतपूर शिवारात घडली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI))

बीड (Beed) जिल्ह्यातील परळी (Parli) येथे 3 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे तीन भावडं शहराजवळ खाणीत कपडे धुण्यासाठी गेले होते. मृत पावलेल्यांमध्ये दोन मुलींचा आणि एका मुलाचा समावेश आहे. ही घटना परळी तालुक्यातील दाऊतपूर शिवारात घडली आहे.

दरम्यान, सुरेखा राजू दांडेकर (वय 13), रेखा राजू दांडेकर (वय 15), रवी नारायण दांडेकर (वय 11) असे मृत झालेल्या बहिण-भावडांची नावे आहेत. दांडेकर कुटुंब खदानीजवळच असलेल्या खडी केंद्र परिसरात दगड फोडण्याचे काम करतात. परंतु, आज एकाच घरातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( हेही वाचा - Monsoon Tracker in India: मुंबई मध्ये 10 ते 15 जून दरम्यान Southwest Monsoon बरसण्याची शक्यता; पहा गोवा, महाराष्ट्र ते कश्मीर कधी दाखल होणार यंदाचा मान्सून?

प्राप्त माहितीनुसार, सुरेखा आणि रेखा या दोन बहिणी खदानीतील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा चुलत भाऊ रवीदेखील आला होता. दरम्यान, कपडे धूत असताना रवी पाण्यात बुडाला. त्यामुळे रवीला वाचवण्यासाठी एका बहिणेने प्रयत्न केला. परंतु, तीदेखील पाण्यात बुडाली. या बहीणींला वाचवण्यासाठी दुसऱ्या बहिणीनेदेखील डोहात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताचं मृतांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला.